नागपूर : नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामाची पाहणी केली… तसेच यावेळी या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी नागपूरच्या जनतेची जाहीर माफी मागितली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी एअरपोर्ट ऑथोरिटी आणि मिहान अधिकारी उपस्थित होते.
मुबंई दिल्ली महामार्ग १३७० किमीचा एक लाख कोटींचा दोन वर्षांत केला आणि तीन किमीच्या रनवेसाठी दीड वर्षे कसे लागतात, हे हास्यास्पद आहे असेही गडकरी यावेळी म्हणाले. २०२४ मे महिन्यात के जी गुप्ता कंपनीला रनवे रिकार्पेटिंगचं काम दिलं. रनवे रिकार्पेटिंगच्या कामामुळे विमान कंपन्यांनी शेड्युल बदलले, त्यामुळे विमान तिकिटांचेच दर वाढले .
हेही वाचा : प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळ धावपट्टीचे काम प्रलंबित आहे. नागपूरमधील उड्डान सेवांवर याचा परिणाम होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश गडकरीजी यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, मी दिल्ली – मुंबई एक्स्प्रेस हायवे दोन वर्षांत पूर्ण केला. पण सहा महिने झाले तरी नागपूर विमानतळावरील रेल्वेचे काम संथपणे सूरू आहे. त्यामुळे विमानसेवांवर परिणाम झाला आहे.