अकोला : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात सुरू करण्यात आलेल्या अनेक विशेष गाड्यांना मध्य रेल्वेने मुदतवाढ दिली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातून मुंबई, पुणे, नाशिक, गोव्याला जाणे सोयीस्कर होणार आहे. अकोला, पूर्णा, लातूर, कुर्डूवाडी मार्ग धावणारी गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष गाडी ५ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे विशेष गाडीच्या ६ जानेवारी ते १ एप्रिलपर्यंत २६ फेऱ्या धावणार आहेत. अकोला, भुसावळ, मनमाड, दौंड कॉर्ड लाईन मार्गे धावणारी गाडी क्र.०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष ४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत धावणाार असून त्याच्या सात फेऱ्या होतील.
हेही वाचा >>> दहा दिवसांच्या अधिवेशनात काय-काय झाले? हा आहे लेखाजोखा
गाडी क्रमांक ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष ५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव विशेष गाडी ३ जानेवारी ते ३० मार्चपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर विशेष ४ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या प्रत्येकी २६ फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक व गाडी क्र. ०१२१२ नाशिक-बडनेरा विशेष गाडी ०१ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या प्रत्येकी ९१ फेऱ्या होतील. सीएसएमटी-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला देखील मुदतवाढ देण्यात आली. गाडी क्रमांक ०२१३९ सीएसएमटी-नागपूर स्पेशल १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ०२१४० नागपूर-सीएसएमटी विशेष ०२ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या प्रत्येकी १४ फेऱ्या होतील. सर्व विशेष गाड्यांचे थांबे आणि रचना समान राहतील. २२ डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.