अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातून पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मध्य रेल्वे नागपूर-मिरज (दोन गाड्या), नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, या ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी अमरावती – पंढरपूर (४ सेवा) ०१११९ विशेष गाडी नवी अमरावती येथून १३ आणि १६ जुलैला २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल, तर ०११२० विशेष गाडी पंढरपूर येथून १४ आणि १७ जुलैला ७.३० ला सुटून दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल. दोन तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ७ सामान्य डबे असतील. बडनेरा, मूर्तीजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डूवाडी थांबे आहेत.

हेही वाचा…आघाडीत बिघाडी होणार…? काँग्रेसकडून सर्व २८८ जागांवर…

खामगाव ते पंढरपूर विशेष : गाडी क्र. ०११२१ विशेष खामगाव येथून १४ आणि १७ जुलैला ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्र. ०११२२ पंढरपूर येथून १५ आणि १८ जुलैला ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ७.३० वाजता खामगावला पोहोचेल. २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ७ जनरल डबे असतील. जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी येथे थांबे आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

भुसावळ ते पंढरपूर गाडी

गाडी क्र. ०११५९ विशेष गाडी भुसावळ येथून १६ जुलैला १.३० सुटून दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्र.०११६० पंढरपूर येथून १७ जुलैला १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १ वाजता भुसावळला पोहोचेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी येथे थांबा आहे. या गाडीला ५ शयनयान, ११ जनरल सेकंड क्लासचे डबे असतील, असे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा…यवतमाळ : तब्बल एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर

नागपूर – मिरज विशेष गाडी

०१२०५ नागपूर-मिरज विशेष (२ सेवा) गाडी १४ जुलैला सकाळी ८.५० वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. तर ०१२०६ गाडी मिरज येथून १८ जुलैला दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. एक तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ७ सामान्य डबे असतील. ०१२०७ नागपूर- मिरज (२ सेवा) १५ जुलैला नागपूरहून सकाळी ८.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी ८ वाजता मिरज येथे पोहोचेल. तर ०१२०८ मिरज येथून १९ जुलैला दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. दोन तृतीय वातानुकूलित, १४ शयनयान डबे असतील. या सर्व गाड्यांना अनुक्रमे अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर हे थांबे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway introduces special trains for ashadhi ekadashi 2024 to alleviate rush of devotees mma 73 psg
Show comments