अमरावती : प्रवाशांची अतिरिक्‍त गर्दी लक्षात घेता मध्‍य रेल्‍वेने विशेष रेल्‍वेगाड्यांचे नियोजन केले असून या गाड्यांच्‍या ९० फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. यामुळे जागेच्‍या प्रतीक्षा यादीचा प्रश्‍न सुटण्‍यास मदत होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांदरम्‍यान या गाड्या चालवल्‍या जाणार असून त्‍याचा फायदा पश्चिम विदर्भातील प्रवाशांना होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्विसाप्‍ताहिक एक्‍स्‍प्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. आता ही येत्या ३० मे पर्यंत (३० फेऱ्या) धावणार आहे. ०२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्‍ताहिक एक्‍स्‍प्रेसचा कालावधी १ जूनपर्यंत (३० फेऱ्या) वाढविण्‍यात आला आहे. ०२१४४ नागपूर-पुणे साप्‍ताहिक विशेष एक्‍स्‍प्रेसच्‍या ३० मे पर्यंत १५ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. ०२१४३ पुणे-नागपूर विशेष एक्‍स्‍प्रेसचा कालावधी ३१ मे पर्यंत (१५ फेऱ्या) वाढविण्‍यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway plans special trains for mumbai nagpur pune amravati mma 73 amy