अकोला : जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान मध्य रेल्वे मार्गाच्या रुळाखालील भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने सोमवारी सायंकाळपासून मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली होती. युद्ध पातळीवर दुरुस्तीचे कार्य केल्यानंतर अखेर मध्य रेल्वेची सेवा मंगळवारी सकाळी पूर्वपदावर आली. धिम्या गतीने गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवासी गाड्या अनेक तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील हिरपूर गेटजवळील पोल क्रमांक ३५३४ जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या ठिकाणा भुयारी मार्गाचे कामदेखील सुरू आहे. साचलेले पाणी रुळाखालून वाहून गेले. त्या पाण्यासोबत गिट्टीदेखील वाहून गेल्याने रुळाचा काही भाग हा अधांतरी झाला.

हेही वाचा – आंतरजातीय विवाह करणाऱ्यांमध्ये संघभूमी, दीक्षाभूमी राज्यात अव्वल

वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. दुरुस्तीचे कार्य सोमवारी रात्री ८.३० वाजतापासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे कार्य सुरू होते. पहाटेच्या सुमारास हे काम पूर्ण झाले. त्यानंतर धिम्या गतीने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली.