अकोला : उन्हाळ्यातील रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.कोयम्बटूर -भगत की कोठी आणि वापी – दानापूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येईल. त्यामुळे उत्तर दक्षिण भारतात जाण्यासाठी प्रवाशांना मोठी सुविधा निर्माण होणार आहे. कोयम्बटूर – भगत की कोठी साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ सेवा फेऱ्या होणार आहेत. क्रमांक ०६१८२ विशेष गाडी १० एप्रिल ते ३ जुलैपर्यंत दर गुरुवारी २.३० वाजता कोयम्बटूर येथून सुटेल आणि शनिवारी रोजी भगत की कोठी येथे ११.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०६१८२ विशेष १३ एप्रिल ते ०६ जुलैपर्यंत दर रविवारी २३.०० वाजता भगत की कोठी येथून सुटेल आणि बुधवारी रोजी कोयम्बटूर येथे ०९.३० वाजता पोहोचेल. या गाडीला तिरुप्पुर, इरोड, सालेम, जोलारपट्टी, काटपाडी, रेणीगुंठा, कडप्पा, यमुनानगर, गूटी जंक्शन, धोणे जंक्शन, कुरनूल सिटी, मेहबूबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगांव, नंदुरबार, उधना, वडोदरा, साबरमती जंक्शन बीजी, भिल्दी जंक्शन, रानीवाड़ा, मारवाड़ भीनमाल, मोदरान, जालोर, मोकलसर, समदड़ी जंक्शन येथे थांबा राहणार आहे. या गाडीत सामान्य, शयन, वातानुकूलित असे १८ डब्बे असतील. वापी-दानापुर-वलसाड साप्ताहिक विशेष गाडीच्या २२ फेऱ्या होणार आहेत.

गाडी क्रमांक ०९०६३ विशेष १९ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर शनिवारी रोजी २२.०० वाजता वापी येथून सुटेल आणि सोमवार रोजी दानापूर येथे ८.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९०६४ विशेष गाडी १९ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर सोमवारी रोजी ११ वाजता दानापूर येथून सुटेल आणि मंगळवार रोजी बलसाड येथे १८.०० वाजता पोहोचेल. या गाडीला बलसाड, नवसारी, भेस्थान, चलथान, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगांव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन द्याल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबा राहणार आहे. अनारक्षित विशेष गाड्या आणि आरक्षित डब्ब्याची तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे घेता येतील. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. या विशेष गाड्यांमुळे उन्हाळ्याच्या गर्दीत रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.