वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी ३ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येईल. २१ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र पक्षीमित्रचे पुरस्कार जाहीर, दिगंबर गाडगीळ यांना ‘जीवनगौरव’
हेही वाचा – सरकारच्या गलथानपणामळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत – वडेट्टीवार
देशातील १३५ शहरांत वीस भाषांत ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. पेपर एक हा पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होवू इच्छिणाऱ्या तर पेपर दोन हा इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी असतो. ही परीक्षा एमसीक्यू पद्धतीने म्हणजे बहुप्रश्न पद्धतीने घेतल्या जाते. प्रत्येक उत्तराला एक गुण मिळतो. निगेटिव्ह मार्किंग नाही. पात्र उमेदवारांना २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.