नागपूर : विमान नागपूर फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात ‘सेसना १७२ आर’ विमान प्रशिक्षणासाठी बुधवारपासून दाखल झाले आहे. फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षणार्थी विमान ताफ्यात पूर्वी ‘सेसना-१७२ आर’ विमान होते. मात्र २०१७ पासून तांत्रिक अडचणीमुळे ते सेवेत नव्हते. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर बुधवारपासून विमान फ्लाईंग क्लबच्या सेवेत पुन्हा दाखल झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विमानाला विभागीय आयुक्त व नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी क्लबच्या व्यवस्थापकीय संचालक दिपाली मोतीयाळे, उप मुख्य उड्डाण आदेशक कॅ. एस. इझीलारासन उपस्थित होते. नागपूर फ्लाईंग क्लब राज्य शासनाच्या मालकीचे असून त्याद्वारे विदर्भ व मध्य भारतातील विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण परवडणाऱ्या दरात दिले जाते. सध्या ‘महाज्योती’ चे २० आणि खाजगी २० असे एकूण ४० प्रशिक्षणार्थी येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण कालावधीमध्ये नियोजित उड्डाणतास पूर्ण करण्याकरिता फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात एकूण चार छोटी विमाने आहेत. यापैकी तीन विमाने ही दोन आसनी आहेत. तर नव्याने दाखल ‘सेसना १७२ आर विमान’ चार आसनी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cessna 172r in fleet of nagpur flying club after five years of waiting cwb 76 amy