अकोला : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रमुख पक्ष उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या आखाड्यात थेट उतरली, तर इतर पक्षांच्या नेत्यांनी वर्चस्व राखण्यासाठी आपआपले पॅनल निवडणुकीच्या रिंगणात दिले आहेत. मतदानासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने सध्या प्रचाराने जोर पकडला आहे. सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला. अकोट, अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा व बाळापूर येथे तुल्यबळ लढती होत असल्याचे चित्र आहे. यावेळी निवडणुकीत प्रस्थापितांपुढे नवख्यांनी आव्हान निर्माण केले.

जिल्ह्यातील अकोला, अकोट या मोठ्या बाजार समित्या आहेत. त्यावर वर्चस्व राखण्याची धडपड राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून सुरू आहे. त्यासाठी तडजोडी देखील केली जात आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत विविध पक्षांनी हातमिळवणी केली. अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांसमोर आहेत. प्रथमच वंचित बहुजन आघाडी बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उतरली. त्यामुळे सहकार पॅनल व वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनल यांच्यात लढत होत आहे. ६२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे १८ संचालक पदांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित आघाडीच्या प्रवेशामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. प्रचारासाठी अल्पकालावधी शिल्लक राहिल्याने भेटीगाठी घेऊन मतदारांना गळ घातली जात आहे. निवडणुकीत काट्याची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोट बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा >>> ‘पवन’पाठोपाठ ‘आशा’ही पळाली अन् वनाधिकाऱ्यांची दमछाक झाली; काय आहे प्रकार, जाणून घ्या एका क्लीकवर…

अकोटमध्ये बाजार समितीत सहकार पॅनल, शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचे युतीचे कास्तकार पॅनल, माजी आमदार संजय गावंडे यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनल तर बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांचे जयकिसान पॅनल अशी चार पॅनल निवडणुकीच्या मैदानात आहेत. या मोठ्या बाजाार समितीवर वर्चस्व राखण्यासाठी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता असल्याने सर्वच पॅनलच्या नेते कसून कामाला लागले आहेत. ठाकरे गट व वंचित आघाडी एकत्रितरित्या लढत आहेत. त्याचा मोठा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. सहकार पॅनलने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. अकोटमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : “कर्नाटकात सत्ता जाणार असल्याने धार्मिक दंगलींचा बागुलबुवा उभा करतायत”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

या निवडणुकीत अडते व व्यापारी मतदारसंघात दोन संचालकांची बिनविरोध निवड झाली. बार्शिटाकळी बाजार समितीसाठी सहकार क्षेत्रातीन नेते सरसावले आहेत. यावेळेस इच्छुकांची मोठी गर्दी आहे. राजकीय पक्षाचा देखील हस्तक्षेप आहे. निवडणुकीत ऐनवेळी फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मूर्तिजापूर तालुक्यात बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात काका-पुतणे समोरा-समोर आले आहेत. ॲड. सुहास तिडके यांचे शेतकरी सहकार पॅनल, तर अप्पू तिडके यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल रिंगणात आहे. मूर्तिजापूरमध्ये १८ जागा असून दोन जागा बिनविरोध झाल्याने १६ जागांसाठी लढत आहे. शेतकरी संघटना तथा विदर्भ आंदोलन समितीने तीन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तिरंगी निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. बाळापूर, पातूर बाजार समित्यांमध्ये देखील तुल्यबळ लढती होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> रानटी हत्तींचे गोंदिया जिल्ह्यात पुनरागमन; नवेगावबांधकडे कूच, बसवोडन गावात अलर्ट

३०७ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण ३०६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत. यामध्ये सर्वाधिक ६६ उमेदवार अकोटमध्ये, तर सर्वात कमी ३२ उमेदवार अकोला बाजार समितीमध्ये आहे. बार्शीटाकळी ४०, तेल्हारा ४५, पातूर ४०, मूर्तिजापूर ४६ व बाळापूर बाजार समितीसाठी ३८ उमेदवार निवडणूक लढत आहेत.