नागपूर : तलाठी भरती घोटाळा आणि इतर नोकर भरतीमधील पेपरफुटीबाबत वारंवार निवेदने देऊन आणि विनंत्या करूनही सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सर्व घोटाळय़ांचा विशेष चौकशी समितीद्वारे तपास करावा व चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी ७५ हजार पदांची भरती सरकारने जाहीर केली. परीक्षेसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली. मात्र, राज्यात झालेल्या बहुतांश नोकरभरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप समितीने केला आहे.
पेपरफुटीप्रकरणी सरकारला न्यायालयात आव्हान
गेल्या वर्षी ७५ हजार पदांची भरती सरकारने जाहीर केली. परीक्षेसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
First published on: 27-09-2023 at 00:09 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge to the government in the paper leak case mumbai print news ysh