नागपूर : पावसाची वाटचाल थांबली आहे असे वाटत असतांनाच आता हीच वाटचाल अडखळली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या२४ तासात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाची शक्यता कुठे?

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून कोकणच्या दक्षिण भागात येत्या २४ तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह या भागांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या सीमेत प्रवेश, शहरापासून चार किमी अंतरावर वाहतूक रोखली..

हवामान खाते काय म्हणते?

सोमवारी राज्याच्या बहुतांशी भगत पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवट जरी पावसाने होणार असला तरीही ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मात्र पावसाची शक्यता नाही. याउलट बऱ्याच दिवसानंतर मोकळे आकाश पहायला मिळेल.

कुठे पाऊस, कुठे ढगाळ वातावरण

सोमवारचा पाऊस वगळता हवामानात फारसे बदल घडून येणार नाहीत. राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह इतर किनारपट्टी भागात वातावरण अंशत: ढगाळ राहिल. तर तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील. या भागांमध्ये पावसाचा जोर मात्र वाढणार नाही.

हेही वाचा >>>सिसिटीव्ही नाहीत मग परीक्षा केंद्र मिळणार नाही

देशातील पावसाची स्थिती काय?

राजस्थान आणि गुजरातसह हरियाणाच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. मात्र, अजूनही काही भागातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. तर तो मध्येच अडकला आहे.  मुंबई शहर आणि उपमगरांमध्ये आकाश निरभ्र राहील, तर काही भागांमध्ये रिमझिम पाऊस राहील. तर ठाणे, पालघर आणि लगतच्या परिसरात मात्र पाऊस राहणार नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of rain again for rain in maharashtra state nagpur rgc 76 amy