नागपूर : Maharashtra Weather Forecast देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही. केरळ, तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला आहे. तर बुधवारी, १८ ऑक्टोबरला राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व आणि ईशान्य भारतातून मान्सून माघारी परतला आहे. आंध्र प्रदेशचे आणखी काही भाग आणि तेलंगणाचे उर्वरित भागातूनही मान्सूनने माघार घेतली आहे. मंगळवारी नैऋत्य मान्सूनने बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित भागांतून माघार घेतली आहे. सिक्कीम, संपूर्ण ईशान्य भारत, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, बंगाल आणि आंध्र प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण दिसून येईल.

हेही वाचा >>> मोफत देवदर्शन सहलीतून नगरमधील नेत्यांचे राजकीय ‘पुण्यसंचय’

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ठाणे, मुंबईत उकाडा जाणवणार आहे. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने सांगितले की, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही पावसाची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of rain in maharashtra what is the prediction of meteorological department rgc 76 ysh
Show comments