नागपूर : भारतात अनेक राज्यांतून मान्सूनने माघार घेतली असली तरीही येत्या २४ तासांत राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढेच नाही तर १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज, १६ ऑक्टोबरला तमिळनाडू, केरळ, पुद्दूचेरी, कराईकल आणि माहेच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, राजस्थान, कोकण किनारपट्टीसह कर्नाटकमध्ये आज पावसाची शक्यता आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक, २ लाखांचे नुकसान; कंपनीविरुद्ध न्यायालयात…

हेही वाचा – जरांगे पाटील यांच्या सभेनंतर ओबीसी आक्रमक, विविध ओबीसी संघटना नागपुरात एकत्र

कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी भागात आज पावसाची शक्यता असून केरळ आणि तमिळनाडूमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १८ ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार असून, त्यानंतर थंडीचा कडाका जाणवणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of rain in some parts of the india in the next 24 hours rgc 76 ssb
Show comments