लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : राज्यात सूर्य आग ओकू लागला असून कमाल तापमानसह किमान तापमानाचा पारा देखील झपाट्याने वर चढत आहे. त्याचवेळी भारतीय हवामान खात्याकडून देशाच्या काही भागात पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नव्हता. मात्र, आता राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या २४ तासात देशासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
देशासह राज्याच्या काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम म्हणून येत्या २४ तासात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हा पाऊस उष्णतेच्या झळांपासून दिलासा देईल असे वाटत असले तरीही राज्यात तापमानाचा पारा४१ अंश सेल्सिअस वर गेला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे हा पाऊस उन्हाच्या झळांपासून कितपत दिलासा देईल याबाबत साशंकता आहे.
आणखी वाचा-नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!
भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासात छत्तीसगड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, उत्तर ओडिशा, पूर्व झारखंडसह पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.