नागपूर : देशातील अनेक भागातून थंडीने आता पूर्णपणे काढता पाय घेतला असला तरी अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देशातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागातून थंडी गायब झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत असून अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. देशातील काही भागात पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये आजपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा – पूर्व आकाशात अपूर्व अनुभुती, गुरुपुष्यामृत दिनी आकाशातही अमृत योग; नेमके काय घडणार? वाचा…

हेही वाचा – खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर डॉक्टरांच्या विद्यावेतन निकषाला छेद! निवासी डॉक्टर संतप्त…

१९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान पश्चिम व पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर मध्य प्रदेशातही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिल्लीत १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of unseasonal rain in these states what is the prediction of weather department regarding vidarbha marathwada rgc 76 ssb