गोंदिया: मागील महिन्यात पारा घसरून थंडीचा जोर चढत चालला होता. आज, मंगळवारी पुन्हा आकाशात ढग जमले. पहाटे पावसाची रिपरिप देखील सुरू झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला झालेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात १२०० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. आणि आता पुन्हा मध्यरात्री पासून आकाशात ढग जमल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कधीही विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा… लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये मुंबई, पुण्यानंतर नागपूर तिसऱ्या स्थानावर

मध्यंतरी दिवाळीच्या दिवसात थंडीचा जोर वाढला होता व त्यानंतर सामान्य वातावरण होते. त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून पुन्हा पारा घसरण्यास सुरुवात झाली व २८ नोव्हेंबर रोजी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. शेतकऱ्यांनी शेतात धान कापून ठेवला होता. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचले. त्यात धान भिजला.

सर्वच स्तरातून नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून पंचनामे देखील केले. जिल्ह्यात बाराशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यानंतर हळूवारपणे तापमानाचा पारा वाढू लागला होता. त्यातच मंगळवारी मध्यरात्री ला १ वाजता पासून पुन्हा आकाशात ढग दाटू लागले. पाण्याचे थेंब देखील पडू लागले होते. दिवस उजाळता आकाशात अवकाळी ढग दाटून आले आहेत. शेतकऱ्यांचे धान अद्यापही बांधात पडून आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of unseasonal rain today 1200 hectares of damage so far in gondia district sar 75 dvr