नागपूर : हवामान खात्याने मुंबईकरांना गोड दिलासा दिला असून उद्या, २२ जूनला मुंबईत मध्यम तर २३ व २४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, सातत्याने बदलणाऱ्या खात्याच्या अंदाजावर आता समाजमाध्यमांवरही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जून महिन्याचा उत्तरार्ध आला तरी मान्सून दडी मारून बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावलेली नाही. मात्र, येत्या चार दिवसांत वातावरणात बदलाचे संकेत हवामान खात्याने दिले असून राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांत येत्या चार दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटा कायम असल्या तरीही २३-२४ जूननंतर विदर्भालादेखील उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. येथेही मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २४ जूनला कोकणात मूसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – Video : पेट्रोल पंपावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओने खळबळ, मोबाईल फोनवर बोलणे जिवावर बेतू शकते

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातदेखील हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वर्तवण्यात अला असून, राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. मात्र, सातत्याने बदलणाऱ्या हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवावा का, यावरूनही खात्याला ट्रोल केले जात आहे.