UPSC Civil Services Final Result 2023 Declared: औद्याेगिक नगरी असलेल्या चंद्रपुरची कन्या शारदा विजया गजानन मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा २८२ रँकने उत्तीर्ण झाली आहे. मुलीने आयएएस होण्याचे स्वप्न साकार केल्याने आईवडिलांनी आनंद व्यक्त केला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक तथा जिल्हा विकास प्रबंधक तथा कवी, लेखक गजानन मादे्शवार यांची शारदा ही मोठी मुलगी. येथील कार्मेल अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगलीच्या वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथून बिटेक पर्यंतचे शिक्षण घेतले. बालपणापासून आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शारदाने बिटेकची परीक्षा उत्तीर्ण होताच दिल्लीत राव स्टडी सर्कल या ॲकेडमीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचे क्लासेस लावले होते. तिथे नियमित अभ्यास करून आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शनही घेतले. सलग चार वर्षे राव ॲकेडमीत अभ्यास केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली.
चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
UPSC Civil Services Final Result 2023: शारदाचे वडील गजानन मादे्शवार यांच्याशी संपर्क साधला असता मुलगी देशात २८२ व्या रँकने उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. मुलगी आयएएस झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही असेही गजानन मादे्शवार म्हणाले.
Written by लोकसत्ता टीम
चंद्रपूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-04-2024 at 15:46 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandapur girl sharda vijaya gajanan madeshwar clears upsc exam with 282 rank rsj 74 css