मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून रोज ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्यावर पैसे घेऊन काम केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यवतमाळमध्ये शिवगर्जना यात्रेदरम्यान एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “निकालाची पर्वा आम्हाला नाही, पण…”, ठाकरे गटाचं शिंदे गटावर टीकास्र; बच्चू कडूंचाही केला उल्लेख!
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
संजय राठोड महसूल राज्यमंत्री असताना पैसे घेतल्याशिवाय काम करत नव्हते. त्यावेळी आमच्या एका शिवसैनिकाला एका प्रकरणात मदत हवी होती. मी संजय राठोडांना याबाबत सांगितले. त्यांनी काम करतो म्हणून सांगितलं, पण काम केलं नाही. शेवटी मी त्यांनी शिवालय येथे बोलावून घेतलं आणि कामाबाबत विचारलं, त्यानंतर त्यांनी पैसे घेऊन ते काम केलं, असा दावा चंद्रकात खैरे यांनी केला.
हेही वाचा – “नारायणरावांची बारकी-बारकी लेकरं…”, नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावर सुषमा अंधारेंची तुफान टोलेबाजी!
चित्रा वाघ यांनाही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनाही लक्ष्य केलं. पुजा राठोड प्रकरणानंतर संजय राठोड यांना घरी जावं लागलं. त्यावेळी चित्रा वाघ यांनी ते प्रकरण लावून धरलं. मात्र, आता राठोड भाजपाबरोबर गेल्यानंतर चित्रा वाघ कुठं आहेत? आता संजय राठोड शुद्ध झाले का? यांनी सिद्ध केलं, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा – “…हा उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का”, रामदास आठवलेंचं थेट विधान
संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावरही दिली प्रतिक्रिया
यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या चोरमंडळ विधानावरूनही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे चोरमंडळींबाबत बोलले, ज्यांनी आमचे वडील बाळासाहेब ठाकरे चोरले, ज्यांनी आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं, त्यांच्याबद्दल संजय राऊतांनी ते विधान केलं होते, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.