अकोला : “आपण कोरे पाकीट असून त्यावर जो पत्ता टाकला जातो, त्या ठिकाणी पोहोचतो. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती आनंदाने स्वीकारू,” असे मत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूरमधून लोकसभेसाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. बारामतीच्या जागेबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले, बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे, त्यासाठी घोषणा करण्याचीही गरज नाही. भारतरत्न पुरस्कारासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्न पुरस्काराबद्दल योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. त्याची संजय राऊतांनी काळजी करू नये, अशा शब्दात त्यांनी राऊत यांना सुनावले. मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर त्यांनी बोलणे टाळले.

हेही वाचा – पिवळ्या पळसाला आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या औषधी गुण व अंधश्रद्धा…

हेही वाचा – भंडारा : गंभीर अनियमिततांचा ठपका, शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घरचा रस्ता

विकसित भारत व महाशक्ती राष्ट्र निर्माणाचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. संकल्पपत्रामध्ये सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांची मते जाणून घेतली. विकास व विश्वासाची ‘गॅरंटी’ म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil in akola hints at getting into the lok sabha election ppd 88 ssb
Show comments