चंद्रपूर: एक देश एक निवडणूक हा मुद्दा चर्चेत असतांना तेलंगना व महाराष्ट्र सीमेवरील चौदा वादग्रस्त गावांतील पाच हजार मतदार दोन वर्षात चौथ्यांदा मतदान करणार आहे. विशेष म्हणजे येथील मतदारांनी यापूर्वी तेलंगना विधानसभा, तेलंगना लोकसभा, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे.

देशातील जनतेला निवडणुकीत एकदाच मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र या जिल्ह्यातील १४ वादग्रस्त गावांमध्ये चार ते पाच हजार मतदार आहेत, जे दोनदा मतदान करतात. याचे कारण महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकार आहे. सीमावादात दोन्ही राज्यांची सरकारे या गावांवर आपला हक्क सांगतात आणि येथील लोकही दोन्ही सरकारच्या योजनांचा लाभ घेतात. गेल्या दोन वर्षांत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत प्रत्येकी तीनदा मतदान केल्यानंतर हे मतदार आता महाराष्ट्र विधानसभेच्या राजुरा मतदार संघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहेत. यापूर्वी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी तेलंगणा राज्यातील आसिफाबाद मतदार संघासाठी सुमारे ४ हजार लोकांनी मतदान केले होते. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला आणि आसिफाबाद लोकसभेसाठी १३ मे २०२४ रोजी मतदान केले होते. आता २ हजार ७८१ पुरुष आणि २ हजार ५१२ महिला असे एकूण ५ हजार २९३ मतदार २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. विशेष म्हणजे मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मापती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पलासगुडा, भोलापठार, लेंडीगुडा ही १४ गावे महाराष्ट्र व तेलंगना राज्याच्या सीमेवर जिवती तालुक्यात आहेत. दोन राज्यांचा हा सीमावाद गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्यांची मतदान पत्रिका आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतदार मतदान करतात. लोकांच्या मते, तेलंगणा सरकारने या गावांमध्ये महाराष्ट्र सरकारपेक्षा जास्त विकास कामे केली आहेत. त्यामुळे या गावांतील नागरिकांचा कल तेलंगणाकडे अधिक आहे. गावांची मुख्य मागणी ही वनजमीन पट्टे देण्याची आहे. मात्र राज्य सरकार देऊ शकलेले नाही. तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वितरीत केले आहेत. येथे दोन्ही राज्यांतील शाळा आहेत. ग्रामपंचायतीही आहेत. एवढेच नाही तर सरपंचही वेगळा आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…

लोकसभा निवडणुकीत या चौदा गावातील लोकांच्या बोटांवर शाईचा प्रयोग केला होता. मात्र तरीही येथील लोकांनी दोन राज्यांच्या मतदानात बऱ्याच दिवसांचे अंतर असल्याने दोन्हीकडे मतदान केले होते. आता पून्हा या गावातील लोकांना चौथ्यांना मतदान करता येणार आहे.

Story img Loader