चंद्रपूर: बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका वाहतूकदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शाह यांनी ३ लाख ८० हजाराची लाच मागितली होती. तेंदूपत्ता वाहतूक करणाऱ्या एका वाहतूकदाराच्या तक्रारीवरून एसीबीने ही कारवाई केली आहे.

तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून ते व्यवसायाने तेंदूपत्ता वाहतूक करतात. ऑगस्ट महिन्यात या वाहतूकदाराने गडचिरोली येथील एका तेंदूपत्ता व्यापाऱ्याचा माल बल्लारपूर येथील बामणी येथे आणला होता, हा सौदा १९ लाख रुपयांना ठरला होता. परंतु सदर व्यापारी मालाची किंमत व वाहतूक देण्यास टाळाटाळ करीत असल्याने वाहतूकदाराने संबंधित व्यावसायिकाविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बल्लारपूरचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी फिर्यादीकडे व्यावसायिकाकडे अडकलेली रक्कम वसूल करण्याच्या बदल्यात ३ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीनंतर तेंदूपत्ता व्यापारी आणि वाहतूकदार यांच्यात १६ लाख २५ हजार रुपये किमतीत समझोता झाला असून, व्यापाऱ्याने ही रक्कम वाहतूकदाराला दिली होती. पैसे मिळाल्यानंतर वाहतूकदाराने या व्यावसायिकाविरुद्ध बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याचे आवाहन केले, मात्र पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाह तक्रार मागे घेण्यास तयार नव्हते, त्याबदल्यात पीएसआय शहा यांनी वाहतूकदाराकडे पैशांची मागणी केली मागणी शेवटी वाहतूकदाराने पीएसआयशी ५० हजार रुपये देण्याचे करार केले आणि याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”

हेही वाचा – नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई

एसीबीच्या पथकाने सापळा रचून वाहतूकदाराकडून ५० हजारांची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व पथकाने केली.

Story img Loader