चंद्रपूर : एका पोलीस कर्मचाऱ्याने पतीपासून विभक्त असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित महिला गर्भवती राहिली. तीन महिन्यांपूर्वी तीने एका बाळाला जन्म दिला. मात्र, आता पोलीस कर्मचारी लग्नाला नकार देत असल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात २९ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. प्रीतम रामटेके असे गुन्हा दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – अमरावती : तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी

शहरातील तुकूम परिसरातील प्रीतम रामटेके हा पोलीस दलात आहे. सध्या तो मोटर वाहन विभागात कार्यरत आहे. प्रीतम रामटेके याची वडगाव परिसरात पतीपासून विभक्त असलेल्या एका महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यावेळी प्रीतम रामटेके याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या आश्वासनावर पीडित महिलेने विश्वास ठेवून त्याला सर्वस्व दिले. यातून ती गर्भवती राहिली. तीन महिन्याअगोदर महिलेने एका मुलाला जन्मही दिला.

हेही वाचा – अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून ‘सायबर फ्रॉड’, नागरिकांकडे पैशांची मागणी

परंतु, पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे पीडित महिलेने रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेनंतर प्रीतम रामटेके हा फरार झाला आहे. रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur a police absconded after getting the woman pregnant ssb