चंद्रपूर येथील कोळसा व्यापारी नरेश जैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर हवाई रुग्णवाहिका चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर आली. मात्र, रात्र झाल्याने रुग्णवाहिका धावपट्टीवर उतरू शकली नाही. त्यामुळे दोन वेळा प्रयत्न केल्यानंतर रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन न जाता परत गेली.येथील कोळसा व्यापारी नरेश जैन यांना शनिवारी सायंकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना येथील डॉ. रोहन आईंचवार यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ हवाई रुग्णवाहिका बोलविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार नागपूर विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. रुग्णवाहिकेसाठी रक्कमही जमा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अमरावती : कुपोषण आणि बालमृत्यूसाठी सर्वच राज्यकर्ते जबाबदार – अजित पवार

आ. किशोर जोरगेवार, खा. बाळू धानोरकर यांनी रुग्णवाहिका मोरवा येथे धावपट्टीवर उतरविण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी संपर्क साधला. तसेच परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली. त्यानंतर रुग्णवाहिका मोरवा येथे आली. मात्र, तोपर्यंत अंधार पडला होता. त्यामुळे धावपट्टीवर रुग्णवाहिका उतरविणे शक्य झाले नाही. वैमानिकाने दोन वेळा रुग्णवाहिका उतरविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. शेवटी रुग्णवाहिका नागपूर येथे निघून गेली. दरम्यान, डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून रुग्णाला रुग्णवाहिकेतून रस्ते मार्गाने नागपूर येथे नेले. अंधारामुळे रुग्णवाहिका धावपट्टीवर उतरू शकली नाही, असे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.