चंद्रपूर : पश्चिम ऑस्ट्रेलिया येथून पाच ते सहा हजार किलोमीटरचे अंतर पार करून आर्ली प्रजातीचे विदेशी पक्षी इरई धरण परिसरात दाखल झाले आहेत. हे पक्षी दरवर्षी येथे येत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. विणीसाठी हे पक्षी भारतात येतात, असे निरीक्षण प्राणिशास्त्र विभागाचे अभ्यासक शुभम संजय आत्राम यांनी नोंदवले आहे. सध्या या पक्ष्यांचा इरई धरण परिसरात मुक्काम आहे.
दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे परदेशी पक्षी उत्तर गोलार्धातून स्थलांतर करून येथे येतात. तसेच काही पक्षी हे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विणीसाठी दाखल होतात. हे पक्षी ‘इंडोमलयन’ क्षेत्र आणि पश्चिम ऑस्ट्रेलियामधून इरई धरण परिसरात दाखल झाले आहेत. आर्ली हे पक्षी फेब्रुवारी ते जून या जवळपास चार महिन्यांच्या काळात येथे मुक्कामी असतात. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची वीण होते. हे पक्षी सहसा संध्याकाळी नद्या आणि तलावांजवळ कीटकांसाठी फिरताना दिसतात. छोटा आर्ली हा आकाराने चिमणीएवढा असतो.
हेही वाचा – कारागृहातील कैद्यांनी फुलवली कोट्यवधीची शेती, तब्बल साडेचार कोटींचे उत्पादन
करड्या रंगाच्या नदीकाठच्या पक्ष्याची पाकोळीसारखे टोकदार पंख असतात. त्याची बाणाच्या आकाराची शेपटी असते. तो संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडताना लहान वटवाघूळसारखा दिसतो. त्याच्या शरीराचा खालील भाग तांबूस छटा असलेला, धुरकट तपकिरी असतो. पोटाचा रंग पांढरा, डोळे आणि चोचीला साधणारी काळी पट्टी असते. वर उडताना खालचा भाग पांढुरका त्यावर काळ्या रेषा असतात.
शुभम आत्राम सध्या गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. नरेंद्र व्ही. हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी संशोधनाचे कार्य करीत आहेत.
हेही वाचा – नागपूर एम्समध्ये बायपास शस्त्रक्रिया ठप्प, भूलतज्ज्ञ सुट्टीवर…
आर्ली हे पक्षी फेब्रुवारी ते जून या जवळपास चार महिन्यांच्या काळात येथे मुक्कामी असतात. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची वीण होते. हे पक्षी सहसा संध्याकाळी नद्या आणि तलावांजवळ कीटकांसाठी फिरताना दिसतात.
पक्ष्याविषयी थोडक्यात…
- छोटा आर्ली हे पक्षी समूहाने राहतात.
- प्राच्य आर्ली या पक्ष्यांचे पाय लहान, टोकदार पंख आणि लांब काटेरी शेपटी असते.
- पाठ, डोके तपकिरी रंगाचे असते.
- हे पक्षी जमिनीवरच घरटी बनवतात. त्यांचे घरटे टिटवीच्या घरट्यासारखे असते.
- हे पक्षी एकावेळी दोन ते तीन अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर निघाले की काही दिवसांच्या कालावधीनंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात.