चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४.४८ टक्के मतदान झाले. चिमूरमध्ये सर्वाधिक ७४.८२ टक्के तर चंद्रपूरमध्ये सर्वात कमी ५३.५७ टक्के मतदान झाले. शहरात मतदारांमध्ये निरुत्साह तर ग्रामीण भागात उत्साह बघायला मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चिमूर व मुल येथे भाजप व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण आली. तर बाबूपेठमधील एका केंद्रावर अन्य महिला मतदान करून गेल्याने गोंधळ उडाला. दरम्यान अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याने मतदानाशिवाय परत जावे लागले. तर भद्रावतीत एकाने ईव्हीएम फोडले असता अटक केली.
जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या एक तासात तर मतदान अतिशय धीम्या गतीने सुरू होते. नंतर काहीसा वेग वाढला. शहरी भागातील सिव्हिल परिसरातील केंद्र ओस पडलेले होते. दुपारी नऊ व अकरा वाजेपर्यंत तिथे मतदान हळू हळू सुरू होते. त्यानंतर दुपारी १ वाजता पर्यंत मतदानाचा वेग वाढला. दुपारी एक वाजेपर्यंत राजुरा मतदारसंघात ३७.३२ टक्के मतदान झाले.
हेही वाचा – उमरखेडमध्ये सरपंचावर हल्ला, यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान
चंद्रपूरमध्ये २९.३ टक्के, बल्लारपूरमध्ये ३५.४१ टक्के, ब्रह्मपुरीमध्ये ३९.९१ टक्के, चिमुरमध्ये ४१.०४ टक्के मतदान झाले आहे . वरोरा मतदारसंघात ३२.२४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुन्हा मतदानाचा वेग मंदावला. मात्र सायंकाळी चार वाजतानंतर पुन्हा मतदार घराबाहेर पडले त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी बघायला मिळाली. शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा झोपडपट्टी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अधिक गर्दी होती. त्याचा परिणाम सायंकाळी पाच वाजतापर्यंत राजुरा मतदारसंघात ६५.५९ टक्के मतदान झाले. चंद्रपूरमध्ये ५३.६७ टक्के, बल्लारपूर ६३.४४ टक्के, ब्रह्मपुरी ७२.९७ टक्के, चिमुरमध्ये ७४.८२ टक्के तर वरोरा मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झाले आहे. पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व कुटुंबियांनी सकाळी ११ वाजता चंद्रपुरातील सिटी शाळेत मतदान केले.
काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी मूल येथे मतदान केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा तर राजुराचे काँग्रेस उमेदवार आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी राजुरा येथे मतदान केले. भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात मतदान केले. जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा परिषद सीईओ विवेक जॉन्सन यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मुल येथे काँग्रेस उमेदवार दारू व पैसे वाटप करीत असल्याची तक्रार सपना मुनगंटीवार यांनी केल्याने तणाव निर्माण झाला होता. येथे काँग्रेसचे विजय चिमद्यालवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुल येथे तणावामुळे पोलिस बंदोबस्त वाढविल्याने छावणीचे स्वरूप आले होते. तर चिमूर येथेही भाजप व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा – कराळे मास्तरला चोपले; भाजप कार्यकर्त्यांशी वाद भोवला…
६० लाखांची रोकड जप्त
राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर येथे फ्लाईंग सर्वेलन्स टीमने कारवाई करून ६० लाख रुपयांची रक्कम व इतर प्रचार साहित्य जप्त केले आहे. निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान सदर रक्कम ही भाजप उमेदवाराची असल्याचे सांगण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण निमजे यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली. येथे मोठ्या प्रमाणात भाजपचे प्रचार साहित्य देखील मिळाले.
ईव्हीएम मशीन आदळली
भद्रावती जिल्हा परिषद हायस्कूल येथील बूथ क्रमांक ३०९ मध्ये मतदानादरम्यान लता शिंगाडे या महिलेने ईव्हीएम मशीन टेबलवर आदळले. त्यामुळे १५ मिनिटे मतदान प्रभावीत झाले. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार अमोल काचोरे यांनी दिली. वामन मेश्राम यांच्या बहुजन राष्ट्रीय पक्षाच्या ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लावो या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार लता मंसाराम शिंगाडे या ६७ वर्षीय महिला कार्यकर्तीने हे कृत्य केले. ही घटना दुपारी साडेतीन वाजता घडली. त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. १५ मिनिटे मतदान प्रभावित झाले. विधानसभा निवडणुकीतील मतदानादरम्यान ही घटना घडली.