चंद्रपूर : जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्यांतर्गत पडोली-घुग्घुस मार्गावर असलेल्या चिंचाडा गावाजवळच्या एका वीटाभट्टीवर काम करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घृणित कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीचे आई-वडील चिंचाडा गावाजवळच्या एका वीटभट्टीमध्ये काम करतात. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आई-वडील त्यांच्या मुलीला झोपडीत झोपवून कामावर गेले होते, तेव्हा तिथे काम करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलीला एकटे पाहून तिच्यावर बलात्कार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई-वडील तातडीने झोपडीत पोहोचले आणि अल्पवयीन मुलाला पकडले. मुलीच्या आई-वडिलांनी पडोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला पकडून बाल सुधारगृहात पाठवले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ३७६(अ) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur district 13 year old boy working at brick kiln raped three year old girl rsj 74 sud 02