चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य सहाही मतदारसंघांत ८७ हजार ८४७ मतांनी वाढले आहे. विशेष म्हणजे, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, कृष्णा सहारे व कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया या भाजपच्या चार उमेदवारांनी एक लाखांपेक्षा अधिक मते घेतली, तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व सतिश वारजूरकर या दोनच उमेदवारांनी लाखांवर मते घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघात विक्रमी मतांची आघाडी होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य वाढले आहे. भाजपला चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, चिमूर, वरोरा व ब्रम्हपुरी या सहा मतदारसंघात मिळून ५ लाख ६७ हजार ३५७ मते मिळाली आहे. तर काँग्रेसला या सहा मतदारसंघात ४ लाख ७९ हजार ७३५ मते मिळाली. काँग्रेस व भाजपाचे मिळून बारा उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविण्याचा मान चिमूरचे किर्तीकुमार भांगडीया यांना आहे. त्यांनी चिमूर मतदारसंघात १ लाख १६ हजार ४६५ मते मिळविली आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी १ लाख १४ हजार १९६ मते घेतली आहेत. भाजपाच्या एकूण चार उमेदवारांना एक लाखांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. यामध्ये बंटी भांगडीया यांच्या पाठोपाठ किशोर जोरगेवार यांना १ लाख ६ हजार ८४१ मते मिळाली. तर सुधीर मुनगंटीवार यांना १ लाख ५ हजार ९६९ मते मिळाली. ब्रम्हपुरीचे कृष्णा सहारे यांना १ लाख २२५ मते मिळाली. तर राजुरा येथे देवराव भोंगळे यांना ७२ हजार ८८२ मते व वरोरामध्ये करण देवतळे यांना ६५ हजार १७० मते मिळाली. दोघांनाही लाखांपेक्षा कमी मते असतानाही विजयी झाले.

As compared to the 2020 Assembly elections, the BJP’s 2025 vote share rose by 8 percentage points
Delhi polls : दिल्लीत पुरुष मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपाकडे वळले तर महिलांची मतं ‘आप’कडे जास्त राहिली; असं का घडलं?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
'आप'च्या विजयी उमेदवारांचा मताधिक्यातील फरक भाजपापेक्षाही जास्त; तरीही पराभव का? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Political News : ‘आप’च्या विजयी उमेदवारांचा मताधिक्यातील फरक भाजपापेक्षाही जास्त; तरीही पराभव का?
भाजपाने ओबीसी आणि उच्चवर्णीयांच्या बळावर दिल्लीचं तख्त कसं काबीज केलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Election Results 2025 : भाजपाने ओबीसी आणि उच्चवर्णीयांच्या बळावर दिल्लीचं तख्त कसं काबीज केलं?
दिल्लीत प्रचंड यश मिळूनही भाजपाला दलितांचा पाठिंबा नाहीच; नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Election Result 2025 : दिल्लीत दलित मतदारांनी भाजपाला का नाकारलं? यामागचं कारण काय?
suvendu adhikari Mamata Banerjee
‘आता बंगालची पाळी’, दिल्ली विजयानंतर भाजपा नेत्याचे ममता बॅनर्जींना आव्हान
Delhi Election Results 2025 news in marathi
दिल्लीतील भाजपच्या अभूतपूर्व यशाचे समीकरण; नीतीत बदल, सूक्ष्म व्यवस्थापन, मोदींचे नेतृत्व!
Arvind Kejriwal
Delhi Assembly Election 2025 Results Update : अर्थसंकल्पातील ‘त्या’ घोषणेमुळे दिल्लीत निकाल फिरले? ‘आप’ला नेमका कशाचा बसला फटका?

हेही वाचा – ‘हैद्राबादचे पार्सल परत पाठवा’, खरेच आता तसे घडणार का ?

काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ चिमूर मतदारसंघातून सतिश वारजूरकर यांना १ लाख ६ हजार ६४२ मते मिळाली. तर चंद्रपूरमधून प्रविण पडवेकर यांना ८४ हजार ३७, बल्लारपूरमधून संतोष सिंह रावत यांना ७९ हजार ९८४, राजुरामधून सुभाष धोटे यांना ६९ हजार ८२८ मते मिळाली. वरोरा येथे प्रविण काकडे यांना अवघी २५ हजार ४८ मते मिळाली. एकूणच विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वच मतदारसंघात चांगली मते मिळविली आहे.

हेही वाचा – VIDEO : वाघाच्या बछड्यांनीही घेतला कोवळ्या उन्हाचा आनंद

लोकसभेच्या तुलनेत काँग्रेसला मतांच्या आघाडीत भाजपाने मागे टाकले आहे. तर ८२ उमेदवार व नोटा मिळून २ लाख ७२ हजार ४१९ मते घेतली आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लोकसभा क्षेत्रात ७ लाख १८ हजार ४१० मते मिळाली होती तर भाजपला ४ लाख ५८ हजार ४ मते मिळाली होती. लोकसभा व सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांची अशी काही गोळाबेरीज झाली की काँग्रेस माघारली व मतदारांनी भाजपला पसंती दिली.

Story img Loader