चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांनी यापूर्वीही राजीनामा नाट्यप्रयोग केला आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष संतोष रावत व संचालक मंडळ त्यांचा राजीनामा मंजूर करते का? याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिंदे यांनी राजीनामा देतांनाच ३६० पदांची नोकर भरती टीसीएस व आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून करावी या आशयाचे पत्र बँकेच्या अध्यक्षांना दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३६० पदांच्या नोकर भरती प्रक्रियेवरून सध्या चांगलाच घोळ सुरू आहे. बँकेच्या विरोधात लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आणि कायदेशीर प्रक्रीयेत नोकर भरती अडकून पडली.

Story img Loader