चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देत आदेश रद्द ठरविला आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आदेश काढून जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाविरोधात चंद्रपूर लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजू मारकवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिले.

sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
india sets conditions for elon musk s starlink satellite licence approval
एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

हेही वाचा – “मी गंगा-भागिरथी नाही”, यशोमती ठाकूर कडाडल्या, म्हणाल्या, “महिलांना पुन्हा गुलामगिरीच्या जोखडात..”

यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि एमडब्ल्यू चांदवानी यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देत रद्द ठरविला आहे. त्यामुळे आंबेडकर जयंतीदिनी जिल्ह्यातील सर्वच देशी, विदेशी, बार व रेस्टारंट सुरू आहेत.

हेही वाचा – मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर; क्रांतीभूमी चिमूरमध्ये माजी मंत्री वडेट्टीवार आक्रमक

रामनवमीला दारूची दुकाने होती बंद

विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या रामनवमी महोत्सव तथा सागवान लाकूड शोभायात्रा दिनी चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील देशी विदेशी दारू दुकाने बंद होती. मात्र, आंबेडकर जयंतीला दुकाने सुरू असल्याने नागरिकांकडून टीका होत आहे.