रवींद्र जुनारकर

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार २०२१-२२ मध्ये या जिल्ह्यात १२ हजार १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६ हजापर ५६२ पुरूष तर ५ हजार ४५३ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २ हजार ३१ लोकांचा मृत्यू हृदय विकाराने झालेला आहे. यात १०५९ पुरूष तर ९७२ महिलांचा समावेश आहे. ऱ्हदयविकारापाठोपाठ न्युमोनिया व श्वसनक्रियसंबंधी आजार १ हजार ६८१, पक्षाघात १ हजार २४६, मुत्रपिंड ४९४, कर्करोग ४२१ या गंभीर आजाराने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
India 2025 astrology predictions in Marathi
India 2025 Astrology Predictions: सोन्या-चांदीचा वाढत राहणार भाव; भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? वाचा ज्योतिषाचार्य उल्हास गुप्तेंचा अंदाज

प्रदूषणाच्या विळख्यात पूर्णपणे सापडलेल्या या जिल्ह्यात ऱ्हदयविकाराचे सर्वाधिक रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ श्वसनाचे आजार, त्वचा, न्यूमोनिया, पक्षाघात, कर्करोग, मुत्रपिंड अशा गंभीर आजाराचे रूग्ण मोठ्या संख्येत या जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्याच नोंदीनुसार करोना संक्रमण वगळता या जिल्ह्यात २०२१-२२ या वर्षी एकूण १२ हजार १५ लोकांचा विविध आजाराने मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ३१ लोकांचा मृत्यू हा ऱ्हदयविकाराने झालेला आहे. त्या पाठोपाठ न्यूमोनिया व श्वसनक्रियासंबंधी आजाराने १ हजार ६८१ मृत्यू, पक्षाघात १ हजार २४६ मृत्यू, मुत्रपिंड ४९४ तर कर्करोगाने ४२१ लोकांचा मृत्यू झालेला आहे.

हेही वाचा >>>बळीराजाचे अश्रू कोण पुसणार !; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची नुकसान पाहणीकडे पाठ, शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही पोहोचले नाही

आत्महत्या २६६ मृत्यू, रहदारी वाहतुक २३१ मृत्यू, विद्युत धक्का ४३, भाजणे व जळणे ८३, इतर अपघातात १९४ मृत्यू, इतर कारणांनी ५ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला. तर बाळंतपणात २० मातांचा मृत्यू झाला, एड्सने ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवतापाने ५, विषमज्वर ३८, क्षयरोग ५६, अतिसार व गॅस्ट्रोने १४ तर डेंगूने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बालमृत्यूची संख्या २०२१-२२ या वर्षी ० ते ५ या वयाेगटाची ५०२ आहे. यामध्ये नागरी भागात ३७२ तर ग्रामीण भागात १३० आहे. ० ते १ वर्ष वयोगटात ४६३ मृत्यू असून ग्रामीण भागात ९८ तर नागरी भागात ३६५ आहे. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२२ मध्ये मृत्यूची ही नोंद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार घेण्यात आलेली आहे. ऱ्हदयविकाराणे होणारे मृत्यूची आकडेवारी ही सर्वाधिक धक्कादायक आहे.

Story img Loader