चंद्रपूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मार्च अखेरपर्यंत देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. मात्र, सरकारची ही घोषणा हवेत विरली असून चंद्रपूर जिल्ह्यात केवळ ४८.५० टक्के शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळाला आहे. ३२ हजार ६७५ शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. हा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना ५ हजार ७२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. शिंदे-फडणवीस सरकारने मार्चअखेरपर्खंत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, राज्यातील शेकडो शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रोत्साहन अनुदानासाठी ६३ हजार ४५० शेतकऱ्यांची खाती पात्र आहेत. त्यापैकी ३६ हजार ७२६ शेतकऱ्यांचे नाव यादीत आले असून त्यांना विशिष्ट क्रमांक मिळाला आहे. ३५ हजार ६५९ शेतकऱ्यांनी आधार पडताळणी केली आहे. त्यापैकी ३० हजार ७७५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा झाली असून याची टक्केवारी ४८.५० टक्के आहे. यासाठी १२७,५७ कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे. ३२ हजार ६७५ शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहे. ही आकडेवारी चंद्रपूर जिल्ह्यातील असून राज्याचा विचार केल्यास लाखो शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. त्यामुळे प्रोत्साहन अनुदान मिळणार की, नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. 

कडो शेतकऱ्यांची नावे यादीत नाही!

शेकडो शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत. यासाठी आतापर्यंत शासनाने तीन याद्या प्रकाशित केल्या आहेत. या तीनही याद्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांची नावे नाहीत. समोरच्या यादीत नाव येईल या आशेने शेतकरी गप्प होते. मात्र, मार्चमहिना तोंडावर आला असतानाही यादीत नाव आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारविरुध्द रोष आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur district only farmers benefited from incentive subsidy rsj 74 ysh