चंद्रपूर: वडसा- ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून महिला डॉक्टर ईशा घनश्याम बिंजवे (२४) हिने उडी मारून आत्महत्या केल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर ईशा हिचे आत्महत्या करतानाचे काही व्हिडीओ समाजमाध्यमात सार्वत्रिक झाले आहे. त्यामुळे या आत्महत्येबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रम्हपुरी येथील प्रसिद्ध डॉक्टर घनश्याम बिजवे याची डॉक्टर कन्या डॉक्टर ईशा हिने मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती रात्री उशिरा कुटुंबाला कळताच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व नातेवाईकांनी शोधा -शोध सुरू केली.

हेही वाचा – कौटुंबिक नात्यांची वीण सैल होतेय का? कुटुंब न्यालयात खटले वाढले

डॉ. ईशा हिला नदीच्या पात्रात उडी घेताना अनेकांनी पाहिले. मात्र तिचा बचाव करायला कुणीही समोर आले नाही. विशेष म्हणजे या आत्महत्येचा व्हिडीओ देखील चित्रित केला गेला. मात्र तिला वाचविण्यासाठी नदी पात्रात कुणीच उडी घेतली नाही. दरम्यान तिचा शोध घेणे सुरू असतानाच बुधवार १७ जुलैला पिंपळगाव (खरकाळा) वैनगंगा नदीच्या तीरावर मृतदेह मिळाला. डॉ. ईशा बिजवे तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथील रहिवासी आहे. सदर मुलगी उच्च शिक्षित घरची आहे. तिचे आई- वडीलसुद्धा डॉक्टर आहेत. त्यांच्या परिवारात आई, बाबा, भाऊ व वहिनी आहे. तिच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – वर्धा : लोकसभा निवडणुकीवेळी का आले नाही? काँग्रेस नेत्यांचा निरीक्षकास सवाल

वृत्तलिहेपर्यंत तिच्या मृत्यूचे कारण कळले नाही. पुढील तपास वडसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय जगताब यांच्या मार्गदर्शानाखाली सुरू आहे. विशेष म्हणजे डॉ. ईशा हिने नदी पत्रात उडी घेतली तेव्हा नदीत पाणी खूप कमी होते. त्यामुळे कमी पाण्याच्या ठिकाणी ती बराच वेळ होती. कमी पाण्यात बुडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. त्यानंतर नदी पात्रात खोलवर पाणी असलेल्या ठिकाणी ती गेली. तिथे तिने स्वतःला पाण्यात सोडून दिले व ती वाहत्या पाण्यासोबत वाहून गेली. त्यामुळेच जवळपास एक दिवस तिचा मृतदेह मिळालाच नाही. शेवटी बराच दूरपर्यंत शोध घेतला असता पिंपळगाव इथे तिचा मृतदेह मिळाला. उच्च शिक्षित डॉक्टर मुलीची आत्महत्या हे सर्वांसाठी एक कोडे व रहस्य बनले आहे. अतिशय समृद्ध कुटुंब असताना डॉ. ईशा हिने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहे. तसेच या आत्महत्येचे व्हिडीओ कुणी घेतले. समाजमाध्यमावर कसे काय सार्वत्रिक केले याचाही शोध पोलीस घेत आहे. डॉ. ईशा हिच्या मोबाईलचा शोध पोलीस घेत असून त्यातून बरीच माहिती मिळू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur doctor girl jumps into wainganga river video taken before suicide rsj 74 ssb
Show comments