चंद्रपूर : आराध्य दैवत माता महाकाली यात्रा २७ मार्चपासून सुरू होत आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यातील भक्तांसह मराठवाडा, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील भक्तांची यात्रेत गर्दी होते. त्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व संबंधित यंत्रणा व महाकाली देवस्थान विश्वस्त मंडळाची आढावा बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय पोलिस अधिकारी एस.पी.नंदनवार, पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, अन्न व औषध विभागाचे नितीन मोहिते, वेकोलीचे व्यवस्थापक आर. के. सिंग, महाकाली देवस्थानचे विश्वस्त सुनील महाकाले उपस्थित होते.

हेही वाचा… आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची पेन्शन बंद करा; खा. बाळू धानोरकर यांची पंतप्रधान, अर्थमंत्र्यांकडे मागणी

हेही वाचा… बुलढाणा: संपामुळे नागरिक फिरकेना; १३ तहसील कार्यालये ओस

यावेळी अपर जिल्हाधिकारी देशपांडे यांनी मोठ्या संख्येने येणा-या भाविकांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय आदींची व्यवस्था, स्वयंसेवक व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने योग्य व सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यात्रा महोत्सव भक्तीभावाने आणि शांततेत पार पडेल. मंदीर परिसरात विश्वस्त मंडळाचे स्वयंसेवक सतत फिरत असले पाहिजे. नागरिकांसाठी सुचनांचे फलक ठळक अक्षरात व दर्शनी भागात लावावे. राज्य परिवहन मंडळाने बसेसचे वेळापत्रकाचे फ्लेक्स लावणे आवश्यक आहे. वाहतुक व्यवस्था खोळंबणार नाही, याची वाहतूक शाखेने दक्षता घ्यावी.परिसराची व नदीकाठावरील घाटाची चंद्रपूर महानगर पालिकेने संपूर्ण स्वच्छता करावी. त्यानंतरच वेकालीने पाणी सोडावे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. मंदीर परिसर, भाविकांच्या गर्दीत व इतर ठिकाणी मोकाट जनावरे जाणार नाही, याचा बंदोबस्त करावा. पोलिस विभागाने तक्रार निवारण केंद्र उभारावे व नागरिकांसाठी सुचनांची माहिती लाऊडस्पीकरच्या माध्यमातून नियमितपणे द्यावी, अशा सूचना दिल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur famous goddess mahakali yatra from 27th march rsj 74 asj