चंद्रपूर: साधी गृहिणी ते आमदार व त्यानंतर राज्याच्या हेविवेट कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार ४१० इतक्या विक्रमी मताधिक्याने पराभव करून खासदार होण्यापर्यंतचा प्रतिभा धानोरकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे आमदार व खासदारकीचे यश त्यांनी अवघ्या साडेचार वर्षांत मिळविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर या ऑक्टोबर २०१९ पर्यंत सध्या गृहिणी होत्या. पती शिवसेनेचे आमदार होते. २०१९ मध्येच काँग्रेसने बाळू धानोरकर यांना चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करून धानोरकर खासदार झाले. त्यानंतर धानोरकर यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघातून साधी गृहिणी असलेल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि प्रतिभा धानोरकर यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा १० हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करून आमदार झाल्या. पती बाळू धानोरकर खासदार व पत्नी प्रतिभा धानोरकर आमदार. सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र ३० मे २०२३ रोजी खासदार बाळू धानोरकर यांचा अकाली मृत्यू झाला. आता सर्वकाही विस्कटणार असे वाटत असतानाच आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या हिमतीने विस्कटलेली घडी सांभाळली.

हेही वाचा – चंद्रपूर : लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला प्रचंड मताधिक्य

उमेदवारीसाठी स्वपक्षीय नेते विजय वडेट्टीवार यांनीच कडाडून विरोध केला. मात्र वडेट्टीवार यांच्याशी दोन हात करीत उमेदवारी अर्ज दाखल करायला दोन दिवस शिल्लक असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची तिकीट मिळवली. लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसचा एकही मोठा नेता आला नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे हे वडेट्टीवार प्रचारात आले नाही तरी चालेल असे म्हणून सावली सारखे धानोरकर यांच्या पाठीशी होते. कन्हेया कुमार, इम्रान प्रतापगडी या दोन नेत्यांशिवाय निर्भय बनो अशा तीन ते चार सभा झाल्या.

हेही वाचा – मोर्शीसह वर्धेने युतीची तर आर्वी, हिंगणघाट, धामणगाव, देवळीने राखली आघाडीची लाज

प्रचार देखील विस्कळीत होता. मात्र धानोरकर यांची निडवणूक चंद्रपूरच्या जनतेनेच हातात घेतली होती. प्रत्येक दहा व्यक्तीपैकी आठ जण धानोरकर यांचेच नाव घेत होता. त्यामुळे धानोरकर यांना बळ मिळत गेले. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात धानोरकर यांच्या पाठीशी जनता उभी राहिली आणि त्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. अवघ्या साडेचार वर्षांत आमदारकी व खासदारकी अशा दोन्ही महत्त्वाच्या निवडणुका धानोरकर यांनी जिंकल्या. त्यांचा गृहिणी ते आमदार व आता खासदार हा प्रवास थक्क करणारा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur housewife to mla and now mp the astonishing political journey of pratibha dhanorkar rsj 74 ssb