चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त असून जनतेने सेवा करण्याची संधी दिल्यास संधीचे सोने करुन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईल, असा आमदार प्रतिभा धानोरकर यांना विश्वास आहे. एका मतदानोत्तर चाचणीत आमदार धानोरकर आघाडीवर राहतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विजयी होण्याचा विश्वास बोलून दाखविला.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

हेही वाचा – आनंदवार्ता! सोन्याचे दर आणखी खाली, जाणून घ्या आजचे दर…

मंगळवार ४ जून रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला विजयाबद्दल पूर्णपणे आशावादी असल्याचे आमदार धानोरकर यांनी सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील जनतेने बाळू धानोरकर यांच्यावर विश्वास दाखवीत त्यांना विजयी केले होते. स्व. खासदार बाळू धानोरकर यांच्यावर जनतेने दाखविलेला विश्वास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता कायम ठेवणार आणि मला निवडून देईल, असाही दावा आमदार धानोरकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – अकोला : भाजपचा वर्चस्वाचा दावा; काँग्रेस व वंचितला परिवर्तनाची आशा, उमेदवार म्हणतात…

या लोकसभा मतदारसंघातील जनतेचे, मतदारांचे धानोरकर कुटुंबीयांवर विशेष प्रेम आहे. या प्रेमाचा प्रत्यय जनता या निवडणुकीत विजयी गुलाल उधळून देणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सहभागी सर्व घटक पक्षांनी एकदिलाने काम केले. प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी, मतदारांशी असलेली बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे विजय महाविकास आघाडीचाच आहे, असेही आमदार धानोरकर म्हणाल्या.

Story img Loader