चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी कोरपना शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल विनायक लोडे (२८) हा अकोला मार्गे मुंबई येथे पळून जात असताना अकोला बस स्थानकावर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध बलात्कार व पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरपना येथील खासगी शाळेमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पीडीत मुलगी आरोपीकडे दर रविवारी खासगी शिकवणीसाठी जात होती. त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची माहिती पालकांना दिल्याने पालकांनी कोरपना पोलीस स्टेशनला जावून सदरची माहिती दिल्यानंतर तात्काळ आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व लगेच पिडीतेस वैद्यकिय तपासणीकरीता जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवून तात्काळ दोन पथके तयार करून आरोपीचे शोधकामी रवाना केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नागपूर: आर्थिक गुन्ह्यात तीनदा अडकलेले डॉ. धवनकर प्रत्येकदा कसे सुटतात? २१ महिन्याने पुन्हा रुजू

आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच अकोला येथे एक पथक रवाना होवून मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी अमोल विनायक लोडे (२८) रा. कोरपना, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपुर यांस रात्रीदरम्यान अकोला येथील बस स्थानकातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुरं यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोहवा. धनराज करकाडे, नितेश महात्मे, जयंत चुनारकर, दिनेश आराडे, पोशि. मिलींद टेकाम स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur korpana city youth congress president amol lode arrested in akola in rape case rsj 74 css