चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस व भाजप या दोनच पक्षांची चर्चा दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपाई, रासप, बसप, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी किंवा आप या पक्षांची चर्चाच नाही. महायुती व महाविकास आघाडीत हे छोटे पक्ष शोधावे लागत आहे.

भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे, तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. दोनच राष्ट्रीय पक्ष अधिक चर्चेत आहेत. या दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पोस्टर, फलक दिसून येत आहे. ‘आप’ देखील राष्ट्रीय पक्ष आहे. मात्र, या पक्षाची जिल्ह्यात कुठेच चर्चा नाही. ‘इंडिया’ आघाडीत सहभागी ‘आप’ निवडणुकीत कुठे आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले आहे. राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार अशी विभागली गेली आहे. शिवसेनेची अवस्थाही ठाकरे व शिंदे सेना अशी झालेली आहे. एक राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत तर एक महायुतीसोबत आहे. शिवसेना शिंदे महायुतीत तर ठाकरे महाविकास आघाडीत आहेत. मात्र, या दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीत दिसेनासे झाले आहेत.

Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी

हेही वाचा…यवतमाळ-वाशिममध्ये निकालाची पुनरावृत्ती की चित्र बदलणार ?

धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या पर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य पोहचले. हा एक अपवाद सोडला तर अन्य राष्ट्रवादी कुठे हा प्रश्न पडतो. मनसेची अवस्था जिल्ह्यात वाईट आहे. रिपाइं हा असंख्य गटात विभागलेला पक्ष आहे. रिपाइंचे काही गट भाजप तर काही गट महाविकास आघाडीत सहभागी आहेत. त्यामुळे रिपाइंचे अस्तित्व लोकसभा निवडणुकीत दिसत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. मायावती यांचा बसपा कुठेच नाही. शेतकरी संघटनेची अवस्थाही अशीच आहे. संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांनी २००९ व २०१४ अशा दोन लोकसभा निवडणूका लढल्या. मात्र, आज ते दिसतही नाही.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लाखावर मताधिक्य घेतले होते. २०२४ च्या लोकसभेत किमान चंद्रपूर मतदार संघात तरी वंचितची चर्चा नाही. रासप, शेतकरी आघाडी, कम्युनिस्ट पक्ष तसेच इतरही छोटे मोठे पक्ष या निवडणुकीत कुठेच दिसत नाहीत. भाजप व काँग्रेसच्या प्रभावात या पक्षाचे नेते व पक्षही झाकोळले आहेत.

हेही वाचा…चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी

‘कुणबी समाजाच्या नावावर राजकीय पोळी शेकणे योग्य नाही’

कुणबी समाजाच्या नावाने सार्वत्रिक झालेल्या एका पत्राने येथे वादळ उठले आहे. काँग्रेस पक्ष हा धर्म व जातीभेद मानत नाही. मात्र कुणबी समाजाच्या नावावर राजकीय पोळी शेकण्याचा तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाज माध्यमातून बदनामी केली जात आहे. आम्ही निष्ठावंत काँग्रेसी हा प्रकार खपवून घेणार नाही. काँग्रेसश्रेष्ठी वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांपैकी ज्याला उमेदवारी देईल, त्याचाच प्रचार करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शफीक अहमद यांनी दिली. येथे आयोजित पत्रपरिषदेत अहमद यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक तथा खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, सेवादल अध्यक्ष नंदू खनके, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, प्रवीण पडवेकर, अली, अशोक मत्ते, वसंता देशमुख उपस्थित होते. कुणबी समाजाच्या नावावर समाज माध्यमात फिरविण्यात येणाऱ्या पत्राबद्दल सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.