चंद्रपूर: मानवीय हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या धोक्याच्या संकटाने गेल्या काही दशकांपासून जगाचे लक्ष वेधले आहे. तथापि, कार्बन शोषणे आणि साठवणूक पद्धती तंत्रज्ञान विकसित करताना अनेक अडचणी होत्या आणि ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नव्हती तसेच त्याचे दूरगामी परिणाम देखील अस्पष्ट होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र आता, एकपेशीय वनस्पती (अलगी/शेवाळ) वापरून कार्बन डाय ऑक्साईड (CO2) चे जैविक कॅप्चर हे विविध औद्योगिक प्रक्रियांमधून आणि मानववंशजन्य स्त्रोतांमधून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त CO2 चा पुनर्वापर करण्यासाठी एक आकर्षक माध्यम मानले जाते. शिवाय, एकपेशीय वनस्पतींद्वारे, CO2 कॅप्चर केले जाऊ शकते आणि जैवविविधतेमध्ये पुनर्वापर केले जाऊ शकते, ज्याचा वापर जैव ऊर्जा(बायोएनर्जी) आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या उत्पादनासाठी लिपिड तयार करण्यासाठी कार्बन स्त्रोत म्हणून केला जाऊ शकतो.

भविष्यात, ही उत्पादने थेट किंवा अप्रत्यक्षपणे अन्न पुरवठा साखळी आणि पिकांवर परिणाम न करता पेट्रोलियम-साधित/पूरक वाहतूक इंधने शाश्वतपणे बदलतील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, CSIR-NEERI यांनी संयुक्त करार केला असून चंद्रपूर वीज केंद्रात बंद लूप प्रकाश उत्प्रेरक क्रियेद्वारे (अलगी/शेवाळ) साठवणूक करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी, कार्बन क्रेडिट्स याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फूट प्रिंट्सचा अंदाज आणि त्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने हाती घेतलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.

हेही वाचा… गुजरातचे राज्यपल म्हणतात,’गडकरींसारखे देशात फारच थोडे नेते, ते प्रेरणास्त्रोत…”

या प्रकल्पाला भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) निधी दिला आहे. २२ नोव्हेंबर रोजी, अधिकृतपणे या करारनाम्यावर (MoA) गिरीश कुमारवार, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि डॉ. अमित बाफना, प्रमुख शास्त्रज्ञ CSIR-NEERI, नागपूर यांनी डॉ. विश्वजीत ठाकूर प्रमुख वैज्ञानिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आहे. तानाजी यादव, प्रादेशिक अधिकारी चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंता श्याम राठोड, डॉ. भूषण शिंदे, विराज चौधरी, अनिल पुनसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, क्षेत्र अधिकारी सुरेंद्र कारनकर, श्रीमती पूनम पोयरेवार उपस्थित होते. पर्यावरण विभागाचे अधिकारी दत्तात्रय पिंपळे (अधीक्षक अभियंता), डॉ. विजय येउल, (कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ) आणि श्रीमती माया डफाडे (वरिष्ठ. रसायनशास्त्रज्ञ) यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. राष्ट्रांची कार्बन उत्सर्जन शून्यतेसाठी वचनबद्धता पूर्ण करण्याकरीता एक उदात्त हेतू साध्य करण्याची ही अद्भुत संधी दिल्याबद्दल चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) आभारी आहे.

भारताचे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR-NEERI), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महानिर्मिती (महाजनको) चे डॉ. पी. अनबलगन, मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संजय मारुडकर संचालक (संचलन), डॉ. धनंजय सावळकर संचालक (खनिकर्म), बाळासाहेब थिटे संचालक (वित्त). अभय हरणे संचालक (प्रकल्प), पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (संवसू-२), डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) आणि राजेश पाटील कार्यकारी संचालक (संवसू-१) यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वीज केंद्र या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur mahaushnika power stations step towards zero carbon emissions rsj 74 dvr
Show comments