चंद्रपूर: शहरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज अवैधरित्या तस्करी केल्या जात आहे. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाकाली कॉलरी, रेती बंकरजवळ दोन युवकांना एमडी ड्रग्जसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवार २० मार्चला अटक केली. जुनेद आवेश शेख , वृषभ धोंगडे, कालू पठाण असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, आज महाकाली कॉलरी, रेती बंकरजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली असता, त्या मार्गावरून दुचाकी होंडा अॅक्टीवा मोपेड गाडी व बुलेट मोटार सायकलवरुन येणारे आरोपी नामे जुनेद आवेश शेख यांचे ताब्यात ५,५६ ग्रॅम एम. डी. ड्रग्स पावडर, तसेच आरोपी नामे वृषभ धोंगडे याचे ताब्यात ३५९ ग्रॅम एम.डी. ड्रग्स पावडर मिळुन आले. दोन्ही आरोपी आणि पाहीजे असलेला आरोपी नामे कालु पठाण असे तिघांविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम ८ (क) २२ (ब) गुंगीकारक मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियिम १९८५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयात एम. डी. ड्रग्स पावडर, अॅक्टीवा मोपेड, बुलेट मोटार सायकल व दोन नग मोबाईल असा एकुण ३,५०,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचारे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, पोअं. गोपीनाथ नरोटे व चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.