चंद्रपूर : नदी खोलीकरण व रुंदीकरणच्या मुद्यावरून पाटबंधारे विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिका आमने-सामने आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एकमेकांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. चंद्रपूर शहर हद्दीतील नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणाची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. तर, हा विषय पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने हाताळायला पाहिजे, असा दावा महानगरपालिकेने केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिका एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर येथील इरई व झरपट नदीचे खोलीकरण, रुंदीकरण यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात पाटबंधारे विभागाने २७ जुलै २०२३, तर महानगरपालिकेने २८ ऑगस्ट २०१३ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. २५ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे बंधनकारक आहे. असे महानगरपालिकेचे म्हणणे आहे. न्यायालयाने दोन्ही प्रमाणपत्रे रेकॉर्डवर घेतली आहेत.

हेही वाचा – अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या आणि स्वतःच फोन करून दिली माहिती

हेही वाचा – कुलर ठरला किलर! विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू; आर्णी तालुक्यातील घटना

या प्रकरणावर ६ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. शहरातील झरपट व इरई या दोन्ही नद्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी, कचरा साठवणूक, चंद्रपूर वीज प्रकल्पातील फ्लाय ॲश इत्यादींमुळे प्रदूषित झाल्या आहेत. तसेच इरई नदी अरुंद झाल्याने पुराचे पाणी नागरी वस्तींत येत असल्याने घराचे मोठे नुकसान होत आहे. इरई व झरपट या नदीपात्रामध्ये मोठमोठी झाडे वाढली आहेत. संजयनगर, कृष्णानगर, इंदिरानगर, अंचलेश्वर वॉर्ड, पठाणपुरा इत्यादी वस्त्यांतील नागरिकांसाठी ही नदीपात्रे शौचालय झाली आहेत. परिणामी, दोन्ही नद्यांच्या संवर्धनासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेतर्फे ॲड. महेश धात्रक, तर पाटबंधारे विभागातर्फे ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी कामकाज पाहिले.