चंद्रपूर : शहरातील १७ प्रभागांतील नाल्यांची साफसफाई आणि गाळ उचलण्यासाठी महापालिकेने थेट अमरावती येथून कंत्राटदार आयात केला आहे. तीन वर्षांसाठी १८ कोटी रुपयांना कंत्राट दिले असले तरी सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साफ सफाई अभावी सर्व प्रभागांतील नाल्या तुडूंब भरलेल्या, गाळ साचलेल्या आणि सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य आहे. महापालिकेतील माजी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या भागिदारीतून ही सर्व कामे सुरू असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. मनपा सर्व प्रकाराच्या साफसफाईवर वर्षांकाठी ३० कोटी रुपये खर्च करते. करापोटी मनपाला केवळ १९ कोटी वर्षाला मिळतात. मनपा आधीच आर्थिक संकटात असताना आता नाली सफाईच्या कामावर कोट्यवधींची उधळण सुरू आहे.

चंद्रपूर महापालिका सत्ताधारी पदाधिकारी असताना भ्रष्टाचाराच्या विविध सुरस कथा, निविदा न काढताच कामे करणे आदी कारणांमुळे सातत्याने चर्चेत होती. आता तर सफाई कंत्राटदार अमरावती येथून आयात केल्याने चर्चेत आली आहे. अमरावतीचे दिपक उत्तराधी यांना शहरातील नाल्या सफाईचे कंत्राट मिळाले आहे. तीन वर्षांसाठी मनपा याकामाचे तब्बल १८ कोटी रुपये कंत्राटदाराला देणार आहे. १ मार्च २०२३ पासून उत्तराधी यांनी काम सुरू केले. याआधी नाली सफाईच्या कामावर २०८ मजूर होते. उत्तराधी यांनी केवळ १३० जणांनाच कामावर सामावून घेतले. निविदेत किती मजूर या कामावर लावायचे याचे बंधन नाही. सतरा प्रभागांतील नाली सफाई आणि गाळ नियमित उचलणे एवढी जबाबदारी कंत्राटदाराला पार पाडायची आहे. याचा फायदा घेत कंत्राटदारने कार्यादेश आदेश मिळताच सफाई मजुरांवर कुऱ्हाड चालविली. त्यांना कामावरून कमी केले. मजुरांनी आंदोलन केले.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

हेही वाचा – नागपूर : महाविद्यालय, शासकीय कार्यालयात ‘हेल्मेट सक्ती’; विना हेल्मेट येणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

आता मजुरांची संख्या १६० झाली आहे. चंद्रपूर शहर जवळपास ८ ते ९ किलोमीटरपर्यंत पसरले आहे. चार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात सुमारे ६०० किलोमीटर नाल्यांची लांबी आहे. त्यामुळे नालीसफाईच्या कामावर मनुष्यबळ अपुरे पडत आहे. आधी प्रत्येक प्रभागात नाली सफाई आणि गाळ उचलण्यासाठी ४ ते ५ मजुरांची नियुक्ती व्हायची. परंतु नव्या कंत्राटदाराने ही पद्धत बंद केली. एका प्रभागातील नाल्याची सफाई झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागात मजूर रवाना केले जातात. त्यामुळे सध्या अनेक प्रभागातील नाल्या तुडुंब भरल्या आहेत. घाण आणि दुर्गंधीने शहरावासी त्रस्त झाले आहे. याकामासाठी कंत्राटदारला पहिल्या वर्षी प्रतिमाह ५१ लाख ६१ हजार ७८६, दुसऱ्या वर्षी ५४ लाख १९ हजार ८७५ आणि तिसऱ्या वर्षी ५६ लाख ९० हजार ८६९ रुपये देण्यात येणार आहे. तीन वर्षांसाठी नाली सफाईवर मनपा तब्बल १८ कोटी रुपये खर्च करणार आहे. या कंत्राटात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या लोकांना कंत्राटात भागिदारी दिल्यानंतर उत्तराधी यांचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा – गडचिरोली : ना दुभत्या गायी मिळाल्या ना पैसे! भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात

चार लाख लोकसंख्येच्या शहरातील नाली सफाईला १६० सफाई मजूर अपुरे पडतात. कंत्राटदाराने स्वतःचे पैस वाचविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. कोरोनाचे संकट कायम आहे. अशावेळी शहरातील साफ-सफाईला प्राधान्य देण्याऐवजी पैसे वाचविण्याचा खेळ सुरू आहे, असे चंद्रपूर, माजी नगरसेवक, पप्पू देशमुख म्हणाले.

Story img Loader