चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील एका २७ वर्षीय विवाहीत महिलेने आपल्या ९ महिन्यांच्या बाळाला विष पाजल्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. पल्लवी मितेश पारोधे (२७) असे मृत महिलेचे नाव आहे. स्मित मितेश पारोधे (९ महिने) असे मुलाचे नाव असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत लग्न झाले. त्यांना ९ महिन्यांचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नितेश पारोधे यांना मुलगा घरातच बेशुद्ध तर पत्नी पल्लवीने गळफास लावल्याचे आढळून आले. ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला. तर, अत्यवस्थ असलेल्या स्मितला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर

हेही वाचा – अमरावतीत दक्षिण आशियातील सर्वात मोठी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्‍था! एमएडीसी आणि एअर इंडिया यांच्यात संयुक्‍त करार

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, मृत मुलीच्या कुटुंबियांनी सासरकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता. तसेच पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता. ही आत्महत्या नसून माझ्या मुलीची तिचे पती व सासू यांनीच हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे. दरम्यान वरोरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाला सुरुवात केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur mother poisoned child then hanged herself why did the mother take the extreme step rsj 74 ssb