चंद्रपूर : महापालिका स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कचरा संकलन व्यवस्थेत त्रुटी राहू नये व नागरिकांना कचरा देण्यास कुठल्याही स्वरूपाची अडचण निर्माण होऊ नये, यादृष्टीने चंद्रपूर महापालिकेतर्फे कचरा संकलनासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली गेली आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा मोटराइज्ड घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. कुठल्याही स्वरूपाच्या कामबंद आंदोलनामुळे त्या विभागाच्या रोजच्या कामात अडथळा निर्माण होतो आणि कचरा संकलनाचे काम हे तर सर्वात महत्वाचे काम आहे.
हेही वाचा : “जयसुख”ची तंबाखू, गुटखा तस्करी जोरात; ७ लाखाचा गुटखा जप्त
चंद्रपूर शहरात आजघडीला रोज अंदाजे १०० टनच्या वर कचरा निर्माण होतो, हा कचरा जर रोज संकलित झाला नाही, तर शहराच्या प्रत्येक लहान मोठ्या चौकात कचऱ्याचे ढीग आढळुन येतील व स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या संभावित प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता मनपाद्वारे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी रोज निर्माण होणार कचरा हा इतरत्र कुठेही न टाकता मोटराइज्ड घंटागाडीमार्फतच देण्याचे आवाहन चंद्रपूर महापालिकेमार्फत करण्यात येत आहे