चंद्रपूर : दुचाकी व चारचाकी वाहनावर नंबर प्लेटच्या जागी नाव लिहिण्यावर निर्बंध आले आहेत. तरीही चंद्रपूर जिल्ह्यात फॅन्सी नंबर घेण्याची क्रेझ कायम आहे. मागील चार महिन्यांत आवडीच्या नंबरसाठी चंद्रपूरकरांनी तब्बल ४२ लाख ८५ हजार रुपयांचा भरणा आरटीओ कार्यालयात केला आहे. त्यामुळे चंद्रपुरात आवडती नावाची नंबर प्लेट घेण्यासाठी नागरिक परिवहन कार्यालयात गर्दी करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकांना दुचाकी व चारकाची वाहनाच्या नंबर प्लेट या आपल्या आवडत्या अंकाचा असावा यासाठी नागरिक लाखो रुपये मोजतात. कोणी श्रद्धेपोटी, तर कोणी हौसेपोटी पसंतीच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात. मात्र, आता हाय सिक्युरिटी नंबरप्लेट आल्यामुळे गाडी घेतानाच नंबर लिहून येत असल्याने, आकर्षक पद्धतीने नंबर लिहिण्यावर निर्बंध आले आहेत. परंतु तरीही अनेकजण आपल्या आवडीच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात.

हेही वाचा – चंद्रपूर : ‘अंबुजा, अदानी परत जा’, जनसुनावणीमध्ये प्रकल्पग्रस्तांची सिमेंट कंपनीविरोधात घोषणाबाजी

आरटीओ कार्यालयातून चॉइस नंबरसाठी अर्ज मागितले जातात. एकाच नंबरसाठी अधिक अर्ज आले, तर लिलाव केला जातो. यावेळी बंद लिफाफ्यात धनाकर्ष जमा करावा लागतो. जास्त रक्कम ज्यांची असेल, त्यास तो नंबर दिला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात बीएच ३३३३ या नंबर प्लेटसाठी वाहनचालकाने दोन लाख दहा हजार रुपयांची बोली लावत हा नंबर घेतला आहे. त्यापाठोपाठ सीडी ७७७७, सीडी ८८८८, सीडी ०१११ या तीन नंबरसाठी ७० हजार रुपये मोजण्यात आले आहे. तर सीडी १२३४, सीडी १०००, सीडी ००१०, सीडी १००१ या तीन नंबर प्लेटसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये मोजले आहे.

हेही वाचा – मुख्याध्यापकांना नवीन वेतनश्रेणी, पण लाभ कोणाला मिळणार? वाचा सविस्तर..

आवडीच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून चंद्रपूर परिवहन विभागाने ४२ लाख ८५ हजार रुपयांचे शुल्क आकारले आहे. मागील वर्षी परिवहन विभागाने आवडीचा नंबर, अवैध वाहतूक यातून ५० कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. आवडीच्या नंबर प्लेटसाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जावून अर्ज करावा लागतो. त्यानंतर शुल्क भरल्यानंतर परिवहन विभाग अर्जांची संख्या लक्षात घेवून नंबर कुणाला द्यायचा हा निर्णय घेतला जातो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur people counted as much as 42 lakh 85 thousand for the favorite number rsj 74 ssb
Show comments