चंद्रपूर : जंगलात बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी बल्लारपूर तालुक्यातील कळमना नियतक्षेत्रात घडली. वामन गणपती टेकाम (५९, रा. कोरटी मक्ता) असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा – सोन्याच्या नाण्यांचा मोह नडला…नागपूरच्या इसमाला नऊ लाखांचा गंडा….
हेही वाचा – नागपूरमध्ये ‘आयपीएल’च्या धर्तीवर हॉकीची फ्रेंचायजी आधारित स्पर्धा!
बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोरटी मक्ता येथील वामन टेकाम सकाळी ८.३० च्या सुमारास नियतक्षेत्र कळमणा येथील वनात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे.) पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला. मृताच्या नातेवाईकास तात्पुरती आर्थिक मदत करण्यात आली. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवली असून वाघाचा शोध घेण्याकरिता २० ट्रॅप कॅमेरे व एक लाईव्ह कॅमेरा लावण्यात आला आहे.