चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ २०१९ मध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी चंद्रपूर येथे आले होते. या सभेला ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी खासदार या नात्याने मलाही मंचावर स्थान देण्यात आले.

मात्र, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे व तत्कालीन उमेदवार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी मला मंचावर जाऊच दिले नाही. शिवसेनेतून काँग्रेस पक्षात आलेल्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी ही खेळी खेळली, तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य नाही, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हेही वाचा…पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघिणीचा संशयास्पद मृत्यू, राज्यात तीन महिन्यात ११ वाघांचा मृत्यू

काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकर यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारार्थ खासदार राहुल गांधी यांची चंद्रपूर येथे जाहीर सभा झाली होती. ज्येष्ठ नेता व माजी खासदार या नात्याने या सभेचे अधिकृत निमंत्रण मला मिळाले होते. सभेच्या मंचावर माझ्यासाठी खुर्चीदेखील ठेवण्यात आली होती. मात्र, शिवसेनेतून काँग्रेस पक्षात आलेले वडेट्टीवार, बाळू धानोरकर व धोटे या तिघांनी, पुगलिया यांना मंचावर स्थान दिले जात असेल तर आम्ही सभेला येणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने; नवे समीकरण कुणाच्या पथ्यावर?

यामुळे सभास्थळी उगाच गोंधळ नको म्हणून आम्ही कुणीच सभेला गेलो नाही. तेव्हापासूनच मी तसेच राहुल पुगलिया काँग्रेसचे प्राथमिक सदस्य नाहीत, असे पुगलिया यांनी सांगितले. मी काँग्रेस विचारसरणी मानणारा आहे. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी तथा गांधी परिवारावर माझी श्रद्धा आहे. आज काँग्रेस सदस्य नसलो तरी विदर्भ किसान मजदुर काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय आहे. विदर्भ किसान मजदुर काँग्रेसने गडचिरोली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान तर वर्धा लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अमर काळे यांना पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात विदर्भ किसान मजदुर संघाने अजून कुणाला पाठिंबा दिला नाही. येत्या काही दिवसांत निर्णय घेऊ असेही पुगलिया म्हणाले.