चंद्रपूर: तीन महिन्यांच्या मुलीने तब्बल ११ मिनीटांमध्ये ५४ पशु व पक्ष्यांना ओळण्याच्या या अफाट बुध्दीमत्तेची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. अवघ्या तीन महिन्यात ५४ पशु-पक्षी ओळखण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड चंद्रपूरच्या मायशा जैन च्या नावाने नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मायशा जैन चे आई-वडील हे चंद्रपूर शहरातील रहिवासी आहे. मायशा जैन च्या आई सलोनी जैन ला मायशा जैनच्या अफाट बुध्दीमत्तेची चुणूक जाणवली. आई-वडील मायशा ला वयाच्या एक महिन्यापासूनच पशु व पक्ष्यांच्या छायाचित्राची ओळख करून देवू लागले. मायशा च्या तल्लख बुध्दीमत्तेने तिने काही दिवसात ५४ पशु पक्ष्यांचे छायाचित्राची ओळख झाली.
हेही वाचा…एसटी बसमध्ये प्रवासी विनातिकीट सापडल्यास…’या’ निर्णयाला वाहकांचा विरोध
कुटूंबियांनी मायशा च्या कुशाग्र बुध्दीने अवाक झाले. त्यामुळे त्यांनी मायशा पशु-पक्ष्यांचे छायाचित्र ओळखण्याचा एक चित्रफीत तयार करून लंडनमधील वर्ल्ड बुक ऑर्फ रेकॉडला पाठविला. वर्ल्ड रेकॉर्ड टीमलाही माईशाची तल्लख बुध्दीमत्ता पाहून आश्चर्यचकीत झाले. त्यामुळे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड च्या टीमने मायशाच्या चित्रफितीची चाचणी केली.
चाचणीमध्ये मायशाने अवघ्या ११ मिनीटामध्ये ५४ पशु-पक्षी ओळखण्याचा विक्रम केला आहे. जगामध्ये सर्वांत कमी वयाच्या मुलांमध्ये हा विक्रम मायशा जैन च्या नावे नोंदविल्या गेला आहे. त्यामुळे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड कडून माशया जैन ला प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले आहे.
हेही वाचा…लोकजागर : दीक्षाभूमी आंदोलनाचा ‘अर्थ’
अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत ५४ पशु-पक्षी ओळखण्याची नोंद चंद्रपूरच्या मायशा जैन झाल्याने चंद्रपूरच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला गेला आहे. इतक्या अल्प वयात मुलींची तल्लख बुध्दीमत्ता पाहून कुटूंबियांना आनंदाचा पारावार उरला नाही. जैन कुटूंबियांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शहरात विविध संस्थेच्या वतीने तसेच जैन समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात देखील मयेशा ने आपल्या असामान्य बुध्दीमत्तेची चुणूक यापूर्वी दाखवलेली आहे.
हेही वाचा…१५ वर्षांपूर्वीच्या छायाचित्रावरून आताचा गुन्हेगार ओळखता येणार…..नागपुरात नव्या तंत्रज्ञानामुळे….
मायेशाच्या या यशाचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मायेशा सध्या ५४ पशू पक्षांचे नाव तोंडपाठ सांगत आली तरी भविष्यात तिला किमान १०० पशू पक्षांची नावे पाठ व्हावी यासाठी कुटुंब प्रयत्नशील आहे. सध्या मायेशा अवघ्या तीन महिन्यांची आहे. एक वर्षाची होईपर्यंत तिला पशू पक्षांसोबत जगाच्या पाठीवरील एकूण देश, भारतातील एकूण राज्य, राजधानी, मुख्य शहरांची ओळख व्हावी असेही कुटुंबाला वाटते. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.