MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Success Story प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा फाटा या गावातील प्रत्युश विकास दुबे याने तब्बल ८० टक्के गुण मिळवून दहावी परीक्षेत यश मिळवले. आई-वडिलांचे छत्र नसताना जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याच्या या अनोख्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करोनानंतर आजाराने दोन वर्षांआधी प्रत्युशच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर आईने कसाबसा संसाराचा गाडा पुढे ओढला. मात्र, काळाने आईलाही आजारपण दिले. प्रत्युश दहावीला असताना आईचे आजारपण वाढले. मार्च महिन्यात प्रत्युशची दहावीची परीक्षा सुरू असताना आईचे आजारपण वाढल्याने त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
BJP president Chandrashekhar Bawankule , Congress president Nana Patole, asrani, sholay film
“नाना पटोले सध्या शोले चित्रपटातील असरानीच्या भूमिकेत,” चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 news in marathi
निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा; वाचा कुठे घडला हा प्रकार?
Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi on Ladaki Bahin Yojana Pune news
महाविकास आघाडीच्या सावत्र भावांचा बहिणींच्या पंधराशे रुपयांवर डोळा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हेही वाचा : Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: बारावीची कसर भरून काढली! बुलढाणा जिल्हा विभागात तिसरा

मनात आईच्या आजारपणाची चिंता असताना प्रत्युशने तीन पेपर दिले. आणि चौथा पेपर होण्याआधीच आई गेल्याचे वृत्त पुढे आले. आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रत्युशची परीक्षा होती. अशा अवघड परिस्थितीत परीक्षा देणे कठीण होते. डोळ्यात असलेल्या आसवांसह त्याने परीक्षा दिली. घरात वडीलधारी मंडळी कुणीही नाही. धीर द्यायला वडीलांकडचे कुणी नातेवाईक नाही. प्रत्युशच्या आईकडील काही नातेवाईकांनी यावेळी त्याला धीर दिला.

हेही वाचा : Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: यवतमाळमध्ये दहावीतही मुलींचीच बाजी; विभागात चौथ्या स्थानावर, निकाल ९४.५७ टक्के

इतक्या कमी वयात सगळच काही हरवून गेल्याने प्रत्युश प्रचंड दडपणात आला होता. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणता येतो हे त्याने दाखवून दिले. सध्या प्रत्युश आणि त्याची लहान बहिण हे दोघेही आईआजीकडे राहतात. त्यांचा आधार असला तरी भविष्यात शासनाच्या योजनांची मदत घेऊन पुढील शिक्षण करावे अशी त्याची इच्छा आहे. पुढे वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. परिस्थिती खडतर असली तरी आयुष्यात समोर जायचे आहे. आज ज्यांचा आधार आहे त्यांना आपला अभिमान वाटेल असे काहीतरी करण्याचा मानस प्रत्युशने व्यक्त केला.