चंद्रपूर : निवडणुकीच्या रिंगणातील प्रतिस्पर्धी उमेदवारांचा आदर, सन्मान करणे सुसंस्कृतपणाचे लक्षणं मानले जाते.चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व चंद्रपूर या दोन विधानसभा मतदार संघात हे चित्र पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे राजकारणाचा चिखल झाला अशी टीका होऊ लागली आहे. पक्ष फोडणे, आमदार पळवून सत्ताबदल करणे यामुळे राज्यातील राजकीय संस्कृतीला गालबोट लागले. सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रतिस्पर्ध्यांमध्ये झाले. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फलक फाडणे, त्याला शेण फ्रांसने असे प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. मात्र काही मतदारसंघात खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका लढविल्या जात आहेत.
हेही वाचा…डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
बल्लारपूर मतदार संघातील मुल तालुक्यात येणाऱ्या चेक बल्लारपूर येथील हनुमान मंदिरात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसचे संतोष सिंह रावत एकाच वेळी दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर हस्तांदोलन करीत एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या. दोघांनी एकाच महाराजांचा आशीर्वाद देखील घेतला. या घटनेची मतदार संघात सर्वत्र चर्चा आहे.
दुसरीकडे चंद्रपूर मतदार संघात भाजप उमेदवार किशोर जोरगेवार व काँग्रेसचे प्रवीण पडवेकर परस्परांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. या दोघांची शहरातील वरोरा नाका चौक येथे भेट झाली. तिथे दोघांनी चहा व नाष्टा एकत्र केला.
© The Indian Express (P) Ltd